गुन्हेगारीपासून दूर ठेवण्यासाठी आईने बदलले घर; तरीही कृत्य सुरूच
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो)
: मुलगा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांच्या संपर्कात राहू नये, यासाठी खासगी शिक्षिका असलेल्या आईने मुकुंदवाडी सोडून पिसादेवी परिसरात खोली भाड्याने घेतली. तरीही १९ वर्षीय मुलाचे गुन्हेगारी जगतातील संपर्क तुटले नाहीत. मुकुंदवाडी पोलिसांनी या तरुणाला गावठी कट्ट्यासह अटक केली असून, हा कट्टा जुलैमध्ये जिन्सी पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या खुनातील कुख्यात आरोपी मुकेश ऊर्फ मुक्या साळवे याचा असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे.
प्रियांशू सतीश खोमणे (वय १९, रा. मुकुंदवाडी), असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक विवेक
प्रियांशू बीएस्सीचा विद्यार्थी
▶ प्रियांशु विवेकानंद महाविद्यालयात बीएस्सीचे शिक्षण घेतो. त्याची आई खासगी शिक्षिका आहे. मुलगा मुकुंदवाडीत सराईत गुन्हेगारांच्या संगतीत बिघडत असल्याचे पाहून त्यांनी त्याला सुधारण्यासाठी पिसादेवीत खोली भाड्याने घेतली होती. मात्र, आईच्या या धडपडीवर प्रियांशुने पाणी फेरले. दुसरीकडे राहायला जाऊनही तो मुक्या साळवेसारख्या गुन्हेगाराच्याच संपर्कात राहिला आणि बाळगल्याप्रकरणी हत्यार पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
सोनवणे यांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कारवाईचे आदेश दिले होते. १० ऑक्टोबर रोजी संतोषीमातानगर येथील दोन एकर मैदानाच्या भिंतीलगत प्रियांशुने कट्टा लपवून ठेवल्याची टीप अंमलदार संतोष भानुशे यांना मिळाली. त्यानुसार सहायक
निरीक्षक रोहित गांगुर्डे, उपनिरीक्षक नरसिंग पवार, हवालदार विक्रमसिंग राऊळ, संदीप वैद्य, भिमा पवार, अनिल थोरे, शाम आढे, विकास गुरुखेल, रवींद्र बेंडे, राहुल राठोड, दीपक इंगळे यांच्या पथकाने छापा मारून प्रियांशुला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने लपवून ठेवलेला कट्टा व मॅगझीन काढून दिले.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions
















